
राजारामबापू फार्मसी महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचालित औषधनिर्माण महाविद्यालय कासेगाव येथील विद्यार्थ्यांची गेब्स हेल्थकेअर सॉल्युशन नवी मुंबई या नामांकित कंपनीच्या मुलाखतीमध्ये तब्बल १५ विद्यार्थी नोकरीसाठी पात्र ठरले.
ही कंपनी मेडिकल कोडींग क्षेत्रामध्ये काम करीत असून मेडिकल कोडर या पदासाठी कंपनीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. या प्रसंगी कंपनीचे एच. आर. स्वस्तिका शेट्टी व सुभाष हंकारे यांनी मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्य सपांदित करण्यासाठी वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरे महाविद्यालयामार्फत आयोजित केली जातात. फार्मा इंडस्ट्रीला आवश्यक असा नोकरदार घडवला जातो व त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी नेहमीच उपलब्ध करून दिल्या जातात अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.मोहिते यांनी दिली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मोहिते, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ.एम.एम. नितळीकर, डॉ. जी. एच. वाडकर यांनी अभिनंदन केले. यासाठी टीपीओ प्रमुख डॉ. एम. एम. नितळीकर, एस. एस. तोडकर, डॉ.आय.डी. राऊत, आर. आर. वखारिय, एस. एस. पाटील, एस.एस.मदने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव प्रा.आर.डी.सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.