राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

इपिसोर्स इंडीया प्रा. लि. मुंबई या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील मेडीकल कोडर या पदासाठी १३ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूद्वारे निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. मगदूम उपप्राचार्य व डॉ. एस. के. मोहिते यांनी दिली.

आय.टी. क्षेत्राशी संबधित मुंबई येथील इपिसोर्स इंडीया प्रा. लि. या कंपनीद्वारे महाविद्यालयामध्ये ऑनलाईन कॅम्पस इंटरव्हूचे आयोजन केले होते. या निवड प्रक्रियेमध्ये कंपनीच्या एचआर आरती पटेल व त्यांच्या अधिकाऱ्यांनी तीन फेऱ्यामधुन विद्यार्थ्यांची निवड केली. मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ७७ महाविद्यालयातील २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर डॉ. एम. एम. नितळीकर यांनी केले. या प्रक्रियेमध्ये डॉ. आय. डी. राऊत, एस.एस. तोडकर यांनी सहकार्य केले. विद्यार्थी प्रतिनिधीनी परिश्रम घेतले. राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगावच्या प्रियांका बागडे, भाग्यश्री सकट, स्वरूपा कापूरकर, विनया मोहिते, साक्षी बदडे, मयुरी कुपकर, ऐश्वर्या सांगडे, अश्विनी चव्हाण, तेजस्वीनी पाटील, प्रणव गुरव, मेधा पाटोळे, मयुरी पाटील, ऐश्वर्या साळुखे या विद्यार्थ्यांची निवड झाली. या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्हूवचे आयोजन नेहमी केले जाते. त्यामुळे विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत कंपनीपूरक प्रशिक्षण दिले जाते. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या या १३ विद्यार्थ्यांचे कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्रा. आर. डी. सावंत यांनी अभिनंदन केले.

Written by 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *