
कासेगाव ता. वाळवा येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात अंतर्गत तक्रार समितीतर्फे ‘महिलांविषयक कायदेशीर तरतुदींबाबत जागरूकता या विषयावर व्याख्यान पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. मगदूम व उपप्राचार्य डॉ. एस. के. मोहिते यांनी केले. प्रमुख वक्त्या अॅडव्होकेट मोनालिसा पाटील यांनी कामकाजाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी अंतर्गत तक्रार समितीचे कामकाज भारतीय दंड संहितेची विविध कलमे, रॅगिंगची व्याख्या आणि त्यासंबंधीचे नियम आणि कायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास प्रा. ए. के. शेवाळे, प्रा. टी. डी. दुधगावकर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. आय. डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. एस. जाधव यांनी आभार मानले.